Home » Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवर आणखी एक मोठी जबाबदार मोठा निर्णय?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवर आणखी एक मोठी जबाबदार मोठा निर्णय?

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली.  त्याचबरोबर त्यांची जागा आता कोण घेणार असा प्रश्नही विचारला जात होता. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर काहीसे स्पष्ट झाले. मात्र अजितदादांकडे असलेले बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याविषयी चर्चा रंगली होती. याविषयी आता महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Sunetra Pawar
Source: Mumbai Tak

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली.  त्याचबरोबर त्यांची जागा आता कोण घेणार असा प्रश्नही विचारला जात होता. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर काहीसे स्पष्ट झाले. मात्र अजितदादांकडे असलेले बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याविषयी चर्चा रंगली होती. याविषयी आता महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्णय जारी केला आहे.

पालकमंत्री पदाबाबत शशनाचा काय निर्णय

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. मात्र अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने काही जणांनी त्यांच्यावर टीकादेखील केली होती. उपमुख्यमंत्री पदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे महायुती सरकारने अजून एक जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदासोबत अजितदादांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. त्यांच्या निधनानंतर पालकमंत्री पदी आता सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही कोणाकडे?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याविषयी देखील जोरदार चर्चा सुरु होती. या पदासाठी प्रफुल पटेल यांची निवड होणार का? असा प्रश्न चर्चेत आला होता. त्यांच्या नावावरुन मोठा वादंग झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की ९ तारखेला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असून मंजूरी मिळाल्यानंतर त्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *