Baramati Byelection 2026: दिवंगत अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच मत होते. पण काँग्रेसने निवडणुका आणि सहानुभूती असे दोन्ही वेगळे मुद्दे असल्याचे अधोरेखित केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. वंचित आघाडीने अगोदरच काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आहे. तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का लागल्याचे मानले जात आहे.

बारामती पोटनिवडणुकीसह राहुरी येथील (Baramati Byelection) पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का लागल्याचे मानले जात आहे.
Baramati Byelection (पोटनिवडणूक) २०२६ वेळापत्रक:
30 मार्च 2026 रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
7 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी
9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत
23 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान
4 मे रोजी मतमोजणी आणि निकाल
6 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण
Baramati Byelection 2026(पोटनिवडणूक) बारामतीत तिरंगी लढत, काँग्रेसचा उमेदवार ठरला?
काँग्रेसने बारामती विधानसभा (Baramati Byelection)पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश विश्वनाथ मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी देखील 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी बारामती विधानसभेच्या (Baramati Byelection) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश मोरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र याला अपयश आले आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात बारामती विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना देखील सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. असं असताना ही निवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम होती. स्वतः शरद पवार ही पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र सध्या तरी या प्रयत्नांना अपयश आला आहे.
Baramati Byelection 2026(पोटनिवडणूक) बारामती, राहुरी मतदारसंघात काँग्रेसची एंट्री
बारामती आणि राहुरी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामतीमधून 6 उमेदवारांचे अर्ज मिळाले आहेत. तर राहुरी मतदारसंघासाठी काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी 4 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. एक-दोन दिवसात उमेदवाराची घोषणा होईल, असा संदेश आम्ही इच्छुकांना दिला आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: BMC Mayor 2026: मुंबई महापौरपदी BJP च्या रितू तावडे यांना उमेदवारी?


